वांगी ग्रामपंचायतीकडून सोन्याचं बक्षीस वाटप

वांगी ग्रामपंचायतीकडून करवसुली सुवर्ण बक्षिस योजनेचे वितरण करण्यात आले. या मध्ये सतिश शिर्के यांना प्रथम, सोमनाथ सुर्यवंशी यांना दुतीय, तर कल्पना यादव यांना तिसरं बक्षीस मिळाले. काल लोकनियुक्त सरपंच बंदना सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच सन २०२३-२४ सालासाठी बांगी ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त कर बसूल व्हावा यासाठी करवसुली सुवर्ण बक्षिस योजना राबवली होती.

सन २०२३-२४ मध्ये ५३४ खातेदारांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरून या योजनेसाठी पात्र ठरले होते. संपूर्ण कर भरणाऱ्या खातेदारांची यादी नोटीस बोर्डवर च सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती.

नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेदारांच्या नावाच्या चिठ्या लकी डॉ पध्दतीने बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या. लहान मुलांकडून तीन चिठ्ठ्या उचलण्यात आल्या. हा लकी ड्रॉ ग्रामसभेचे आयोजन

करुन इन कॅमेरा काढण्यात आला होता. या योजनेमध्ये एकुण तीन बक्षिसं ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पाहिले

बक्षिस सतिश आनंदा शिर्के यांना पाच ग्रॅम सुवर्ण कर्ण फुले, तर दुसरे बक्षिस सोमनाथ रामचंद्र सुर्यवंशी यांना तीन ग्रॅम सुवर्ण कर्ण फुले आणि तृतीय बक्षीस कल्पना मधुकर यादव यांना दोन ग्रॅम सुवर्ण कर्ण फुले या बक्षीसांचे वितरण सरपंच सौ. वंदना सुर्यवंशी, उपसरपंच हबीच पटवेकरी व सर्व सदस्य व ग्रामसदस्या यांच्याहस्ते करण्यात

आले. अनोखी योजना ग्रामपंचयापतीने राचवल्याने पंचक्रोशीसह तालुक्यात सर्वत्र याच योजनेची चर्चा दिसून येत आहे.

वांगी हे गाव कडेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नावारूपास आहे. ग्रामपंचायतीकडून लोकांनी कर भरण्यासाठी प्रोत्साहीत व्हावे आणि स्वखुशीने आपली पाणीपट्टी, घरपट्टी, भरावी यासाठी अशी योजना सुरू करण्याचे ठरवले होते. तसेच सन २०२४-२५ या सालासाठी वांगी ग्रामपंचायतीने १०० आकर्षक बक्षीसांचे आयोजन केले आहे. तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरुन योजनेत सहभागी व्हावे. (सौ. वंदना सुर्यवंशी (सरपंच))
Oplus_131072

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top