ग्रामपंचायत वांगी

तालुका - कडेगाव, जिल्हा - सांगली

(स्थापना - १५६०)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाचा इतिहास व माहिती! 

वांगी हे गाव इतिहासकालीन असुन हे गाव भुईकोट किल्ला म्हणून प्रसिध्द होते. त्याची साक्ष म्हणून इतिहास कालीन कमान वेस आहे. वांगी गावची स्थापना सन १५६० साली झाली आहे. शिवकालीन काळात ८४ गावचा महसुली गाव होते तसेच ब्रिटीश काळात २१ गावचा सजा वांगी येथील ब्रिटीश बंगल्यातुन चालत होता. ब्रिटीश कालीन काळात गावातील महादेव यशवंत पाटील देशातील सर्वोत्कृष्ट कैसर ए हिंद पुस्कार प्राप्त झाला होता. स्वातंत्र शाहिर शंकरराव निकम हे वांगी गावचे आहेत. राज्याचे दिव्यंगत जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक वांगी येथे आहे. वांगी गावचे ग्रामदैवत असलेल्या अंबिका मंदिर हे संपुर्ण जिल्हयात प्रसिध्द आहे. कडेगांव व खानापूर तालुक्यात सर्वात जास्त ३६०५.०६ हेक्टर क्षेत्रफळाचे गांव वांगी हे गाव पुर्वी सोन्याची खाण म्हणून प्रसिध्द होते. कडेगांव व खानापुर तालुक्यात वांगी गावची यात्रा जास्त दिवस चालणारी मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द आहे.

    गावात सर्व सेवा आहेत. उदा. ग्रामपंचायत सोसायटी पोष्ट, दवाखाना, शाळा, अंगणवाडी, कृषिसेवा केंद्र, एम्.ए.सी.बी. ऑफिस, वाचनालय, सभागृह, सुसज्ज ग्रामदैवत, टेलिफोन ऑफिस, पशु दवाखाना, तलाठी ऑफिस, भूमिअभिलेख कार्यालय येरळा नदीकाठी वसलेले गाव. गावातील शेती १००% बागायत क्षेत्र आहे. ग्रामपंचायतीने पार्किंग शेड उभारणी केली आहे. मुख्य चौकात एल.ई.डी. स्क्रीन उभारली आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग
Scroll to Top