वांगी ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थीनींना सायकल वाटप

वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळेत शिकणाऱ्या यस्तीवरील शालेय सन २०२४-२५ च्या १० टक्के महिला व बालकल्याणासाठी असणाऱ्या राखीव ग्राम निधीतून। एकुण ५० सायकलींचे वाटप सरपंच सौ. बंदना सुर्यवंशी, उपसरपंच प्राजक्ता कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते व माध्यमिक विद्यालय शाळा व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी बांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या प्रांगणात पार पडला.

यावेळी बोलताना सरपंच सी वंदना सुर्यवंशी म्हणाल्या की, बांगी गाव हे बहुतांशी वाड्या वस्तीवर विखुरलेले असून जवळपास २ ते ३ की. मी. अंतरावरून पायपीट करून शाळेत येणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थीनी आहेत, त्यांची प्रवासाची बारमाही रमाही सोय व्हावी व त्यांचा वाचलेला वेळ त्यांना अभ्यासासाठी देता यावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला आहे. ‘बेटी पढाओ’ या उपक्रमाला चालना देणारे हे हे एक क्रियाशील पाऊल असून जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन यापुढेही असे विधायक उपक्रम राबविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच इयत्ता पाचवी च सहावीच्या विद्यार्थीनींना पुढे दहावीपर्यंत या सायकलचा वापर होणार आहे, यामुळे गावातील मुलांना आपल्या गावातच शिक्षणाची सोय होणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल मधील ५० विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सायकलींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पाटील सर सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रभाकर पवार सर यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य श्री शशिकांत चव्हाण यांनी मानले. यावेळी माजी उपसभापती रवींद्र कांबळे, माजी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, सुर्योदय सुर्यवंशी, अॅड अमोल मोहिते, रमेश एडके, ग्रामपंचायत सदस्य सदस्य शशिकांत चव्हाण, विक्रमसिंह औंधे, बंटी कांबळे, बुबाजी देशमुख, संतोष मोकळे, सदस्या राधिका गुरव, बिजया सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, सत्यवान कचरे, सुहास माळी, रवींद्र मोहिते, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top