जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा ग्रामपंचायतच्यावतीने गौरव

जागतिक महिला दिनाचे (९ मार्च) औचित्य साधून वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वांगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या थोर विभूर्तीचे फोटो पुजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका, अशा सेविका, अंगणवाडी सेविका, बैंक सखी तसेच बचत गट प्रवर्तक या महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना सूर्यवंशी, उपसरपंच कु. प्राजक्ता कदम, ग्रामपंचायत सदस्या सी नीलम कचरे, श्रीमती पार्वती माळी यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नीलम कचरे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी प्राजक्ता कदम यांनी केले.

यावेळी बोलताना सरपंच सौ. सुर्यवंशी म्हणाल्या की, आजच्या काळात महिला या विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. कुटुंबाच्या आरोग्याबरोबरथ समाजाचे आरोग्य जपण्याचे काम या केवळ महिलाच करू शकतात, कारण आपल्या घराची परिसराची स्वच्छता महिला नेहमी करत असतात. त्यामुळे आपल्या घराबरोबरच आपला परिसरही स्वच्छ राहण्यास मदत होते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच पाणी काटकसरीने वापरणे, निसर्ग संवर्धन हा सुद्धा महिलांचा विशेष गुण आहे. ग्रामपंचायत सदस्य श्री शशिकांत चव्हाण यावेळी म्हणाले की, धकाधकीच्या जीवनामध्ये पुरुष मंडळी कामधंद्या निमित्त जास्तीत जास्त घराबाहेर असतात, परंतु लहान मुलांच्या शिक्षणाची, त्यांना चांगले संस्कार देण्याची तसेच स्वच्छता, आरोग्य, घराचे आर्थिक व्यवस्थापन, शेतीमध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने योगदान देण्याचे काम

ग्रामीण भागामध्ये महिला अतिशय तळमाळीने करत असतात. त्यामुळे कुटुंब आणि समाजाचा विकास होण्यास एक प्रकारे हातभारच लावला जातो. यावेळी सी वैशाली लांडगे आरोग्य विषयक माहिती दिली. विद्या कांबळे, वैशाली लांडगे, शितल मदने, दिपाली औधे, आशा पसाले, मंदाकिनी सुतार, शुभांगी शेटे, प्रियांका सूर्यवंशी, प्रियंका पोळ, दयावती बाधिरे, हेमा मोहिते, निता शिर्के, अधिनी राऊत, शितल सावंत सारिका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. अंबिका पतसंस्थेचे संचालक श्री विजयसिंह कदम यांनी सर्व उपस्थित महिलांना त्यांचे वतीने गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री शशिकांत चव्हाण, श्री संदीप सूर्यवंशी, श्री अविनाश आँध, माजी उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी श्री मारुती ढोक, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होत्या.

Oplus_131072

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top